बेळगाव / प्रतिनिधी

अवयव दानाबाबत जनजागृती करण्यासाठी केएलई संस्था आणि चेन्नईच्या मोहन फाऊंडेशनच्या वतीने आज बेळगावात भव्य स्केटिंग, बाईक आणि सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयव दानाबाबत जनजागृती करण्यासाठी, बेळगावात आज केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, चेन्नईचे मोहन फौंडेशन आणि राज्य सरकारच्या जीवसार्थकता विभागातर्फे अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी टिळकवाडीतील आरपीडी सर्कलपासून  स्केटिंग, सायकल आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मयुरा शिवलकर आणि ट्रॅफिक पोलिस आफताब एस. के. यांच्या हस्ते आज सकाळी 8.45 वाजता या रॅलीला चालना देण्यात आली. शहरातील आरपीडी सर्कल, गोवावेस-बसवेश्वर सर्कल, गोगटे सर्कल, फिश मार्केट, छत्रपती संभाजी सर्कल, कॉलेज रोड, चेन्नम्मा सर्कल, श्रीकृष्ण देवराय सर्कल अशा मार्गावरून फिरून ही रॅली डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि केएलई संस्थेच्या वैद्यकीय संशोधन केंद्रावर पोहोचली. रॅलीत विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध खेळाडू, शाळकरी मुले आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते.