बैलहोंगल पोलिसांची कारवाई


बैलहोंगल/वार्ताहर

बैलहोंगल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतात पिकविलेल्या 505 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. बैलहोंगल विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी यांच्या नेतृत्वाखाली बैलहोंगल पोलिसांनी गांजाची लागवड केलेल्या शेतात धाड घालून 250 ग्रॅम वजनाची गांजाची रोपे आणि 255 वजनाचा सुका गांजा असा एकूण 505 ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी बैलहोंगल पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.