विजयपूर / वार्ताहर
विजयपूर शहरात गॅंगवाडी तसेच शहरातील बसवनगर,कीर्तीनगर, मिनाक्षी चौक, अरकेरी आणि इतर ठिकाणी शनिवार 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा. 17 मि. 3.5 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा जिल्ह्याच्या बसवण बागेवाडी तालुक्यातील उकली गावानजीक सायंकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
विजयपूर जिल्ह्यात गत महिनाभरापासून वारंवार भूकंप होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
0 Comments