मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना केली सूचना
पूरग्रस्तांच्या फाईल्स त्वरित पाठविण्याचे दिले निर्देश
व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद
बेंगळूर / प्रतिनिधी
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आज सायंकाळी 4 वा. सुमारास आर.टी.नगर येथील निवासस्थानावरून नजीकच्या पूरग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या चर्चेत सहभागी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसामुळे पुराचा फटका बसलेल्या नागरिकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रकरणी बाधितांच्या फाईल्स लवकरात लवकर पाठवून उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालय संकुलातील अधिकारी आणि दक्षिण आणि कन्नड, कोडगु, शिमोगा, हसन, मंड्या, म्हैसूर, दावणगेरे, तुमकूर, रामनगरा, यादगिरी, कोप्पा, हावेरी, बिदर, कलबुर्गी, गदग, चिकमंगळूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
0 Comments