बेंगळूर / प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा त्यांनी आज फोन करून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मुख्यमंत्री आर. टी. नगर येथील निवासस्थानी उपचार घेत आहेत. येडियुराप्पा यांच्याशिवाय मंत्री सी. एन. अश्वत नारायण, हलप्पा आचार, प्रभू चौहान, बी.सी.नागेश यांनीही मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments