बेळगाव / प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी शहरात गणेशोत्सव पूर्वीप्रमाणेच मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवार 24 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह शहर पोलिस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांनी शहराच्या उत्तर भागातील गणेश मिरवणूक मार्गांची पाहणी केली.
यावेळी मिरवणुकीच्या मार्गांवरील समस्या जाणून घेत त्या लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत बेळगाव उत्तरचे आमदार ॲड.अनिल बेनके, बेळगाव लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय जाधव, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments