बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या गोल्फ क्लब परिसरात  दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेला बुधवारी सायंकाळपर्यंत यश मिळाले नाही. भुकेलेला बिबट्या रात्रीपर्यंत बाहेर येईल अशी शक्यता आहे. यासाठी सात ते आठ शार्प शूटर बिबट्याला बंदुकीच्या साहाय्याने गुंगीचे इंजेक्शन देण्यासाठी सज्ज आहेत. याशिवाय ड्रोन कॅमेरा, शिमोगा येथून आणलेले प्रशिक्षित टस्कर हत्ती अर्जुन आणि आलीया, मुधोळ श्वान, डुक्कर पकडणाऱ्यांचे पथक, सामाजिक कार्यकर्ते यांनी बिबट्याला शोधण्यासाठीच्या मोहिमेत  भाग घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अशा स्थितीत गोल्फ क्लब परिसरात अंधार असल्यामुळे आश्यर्य व्यक्त करण्यात येत आहे.