बेळगाव/ प्रतिनिधी
हलगा ता. बेळगाव येथे हलगा-तारिहाळ मार्गावर एका दुचाकीस्वाराचा अज्ञातांनी मानेवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. ही घटना सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटे ते 4 वा.45 वा. सुमारास घडली.
गदगय्या हिरेमठ (वय 40) असे खून झालेल्या दुचाकीस्वारांची नाव असून तो सौंदत्ती तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
या घटनेत अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार केल्यामुळे त्या दुचाकीस्वाराची मान तुटून खाली पडल्याने, तो दुचाकी वरच रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच गतप्राण झाला. या प्रकारानंतर हलगा-तारिहाळ मार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय शिन्नूर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाची हिरे बागेवाडी पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments