राजेश देवगिरी यांचा वाढदिवस साजरा


विजयपूर / दिपक शिंत्रे 

विजयपूर नगरसभेचे माजी अध्यक्ष, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजेश देवगिरी यांचे राजकीय क्षेत्रातील विविध नेत्यांशी असलेल्या स्नेह संबंधांमुळे भावसार समाजास चांगलीच मदत झाली असून भावसार समाजाच्या प्रगतीमध्ये राजेश देवगिरी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मनोगत भावसार समाजाचे उपाध्यक्ष मिलन मिरजकर यांनी व्यक्त केले.

भावसार समाजाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेश देवगिरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भावसार भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी बोलताना महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्माताई इजंतकर म्हणाल्या, समाज कार्यात महिलांना व युवकांना नेहमीच प्रोत्साहन देण्यारा राजेश देवगिरी यांचे व पंचमंडळाचा सदस्यांचा सहकार्य मुळे आज महिला मंडळ व युवक समिती मजबूत झाली असून समाजाच्या प्रत्येक कार्यात सहभागी होऊन उत्साहाने कार्यरत असलेल्या सांगितले.

वाढदिवसाच्या शुभेच्छा व सत्कार स्विकारून बोलताना राजेश देवगिरी म्हणाले, आपल्या समाज जरी लहान असला तरी कार्य महान आहे, समाजाच्या सर्व घटकांचे पदाधिकारी व सर्व समाज बांधवांनी तन, मन धनांनी सहकार्य केल्यामुळेच भावसार समाज प्रगतीपथावर असून मी कारणीभूत असल्याचे प्रामाणिक मत व्यक्त करीत समाजाचे ऋण फेडण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांमुळे मला समाधान व आनंद मिळत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी पंच मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आर.एन. महिंद्रकर शिरीषकुमार झिंगाडे, अतुल पुकाळे, विजय नवले,  शिवप्पा देवगिरीकर श्रीनिवास जवळकर, रमेश हंचाटे, उमेश देवगिरी, महिला मंडळाच्या सेक्रेटरी सौ. लता झिंगाडे, सौ निर्मला सुलाखे सौ.राजश्री हिरासकर, सौ रुपा हिबारे, सौ बिना नवले, सौ. रुपाली हंचाटे, सौ. नंदा पुकाळे व युवक समितीचे अध्यक्ष विशाल पुकाळे, नितीन मिरजकर, नितीन शिंत्रे, विशाल जवळकर, राहुल झिंगाडे, राजू बोंडगे, संतोष आकोडे, विनय पंतगे, संजय टिकारे, सागर गुज्जर, उदय  पंतगे तरुण संघाचे अध्यक्ष विनायक कुंटे, गणेश हंचाटे व इतर उपस्थित होते.