महिला पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांचे प्रतिपादन

जायंट्स सखी स्वयंसिद्धा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात


बेळगाव / प्रतिनिधी

पुरुषांच्या बरोबरीने महिला आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. ज्या क्षेत्रात संधी मिळेल तिथे कर्तृत्व सिद्ध करून संधीचे सोने करुन महिलांनी  सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे असे प्रतिपादन महिला पोलिस स्थानकाच्या निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी केले.

जायंट्स सखी तर्फे संयुक्त महाराष्ट्र चौक येथे आयोजित महिला पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. महिलांना रिक्षातून सुरक्षितरीत्या प्रवास करता यावा याकरिता प्रभा बिशीरोटी यांची प्रेरणा घेऊन इतर महिलांनीही या व्यवसायात पुढे यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

प्रारंभी जायंट्स सखीच्या सचिव  सुलक्षणा शिनोळकर यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्षा अपर्णा पाटील यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यानंतर ज्योती अनगोळकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या श्रीदेवी पाटील यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याचबरोबर यंदाच्या प्रथम स्वयंसिद्धा पुरस्कार विजेत्या पिंक ऑटो चालक प्रभा बिशीरोटी यांना प्रमुख पाहुण्या श्रीदेवी पाटील आणि जायन्ट्स सखीच्या अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाला फेडरेशनच्या संचालिका नम्रता महागांवकर, शितल नेसरीकर, ज्योती सांगुकर, सुवर्णा काळे, राजश्री हसबे, वैशाली भातखांडे, वृषाली मोरे, अर्चना कंग्राळकर, शीला खटावकर, शितल पाटील, दिपा पाटील, मनीषा कारेकर, वरदा आंगडी, रेणू भोसले  उपस्थित होत्या.