विजयपूर / वार्ताहर 

हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी एकाच टेबलवर बसलेल्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे मोठ्या भांडणात पर्यावसान होऊन चौघांनी एकत्र येत एकाचा निर्घुण खून केल्याची घटना विजयपूर शहरातील मनगुळी बायपास नजीक एका हॉटेलमध्ये दि. 21 ऑगस्ट रोजी घडली होती.


याप्रकरणी चारही आरोपींना विजयपूर पोलिसांनी दि. 25 ऑगस्ट रोजी अटक केली. गणपत रजपूत (रा. विजयपूर ) असे मृताचे नाव आहे. तर नागराज गणी (वय 23), अभिषेक दिलीपसिंग रजपूत (वय 20), रमेश उगारकर (वय 27), शिवपुत्र नावी (वय 24) सर्वजण रा. विजयपूर  अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.


विजयपूरचे जिल्हा पोलीस प्रमुख एच.डी.अनंतकुमार यांच्या नेतृत्वाखाली विजयपूरचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख राम अरसिद्दी, डीएसपी सिद्धेश्वर, मदभावी ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय संगमेश पालभावी, विजयपूर ग्रामीणचे पीएसआय ए. एस. उप्पार आदींनी ही कारवाई केली.