आलमेल पोलिसांची कारवाई 

 मृत प्रशांत खत्री 

विजयपूर / वार्ताहर 

नातेवाईकांमधील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची घटना विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील कडगी गावात दि. 24 ऑगस्ट रोजी घडली होती. यानंतर मुख्य आरोपी आपल्या साथीदारांसह फरार झाला होता. प्रशांत खत्री असे  प्रकरणातील मृताचे तर बशीर मुल्ला असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

  

प्रकरणाची माहिती मिळताच आलमेल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला होता. दरम्यान या तपासाला अवघ्या एका दिवसातच यश आले आणि पोलिसांनी आरोपीसह सात जणांना अटक केली.

याबाबत मिळालेली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत खत्री व बशीर मुल्ला,दोघेही रा.कडगी ता. सिंदगी, जि. विजयपूर या दोघांची घनिष्ठ मैत्री होती. मात्र प्रशांत खत्री याचे बशीर मुल्ला त्याच्या नातेवाईकांमधील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दरम्यान ही बाब बशीर मुल्ला याला समजली. याचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने त्याने प्रशांतचा काटा काढण्याचे निश्चित केले.

ठरविल्याप्रमाणे दि. 24 ऑगस्ट रोजी बशीरने प्रशांत याला कडगी याला गावातील नाल्यानजीक बोलाविले.प्रशांत नाल्यानजीक पोहोचताच बशीर मुल्ला आणि साथीदारांनी कुऱ्हाडीने घाव घालत प्रशांतचा निर्घुण खून केला आणि तिथून फरार झाले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आलमेल पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला होता. या तपासात प्रकरणातील मुख्य आरोपी बशीर मुल्ला सह सात जणांना अवघ्या एका दिवसातच ताब्यात घेतले.अटक केल्यानंतर कसून चौकशी केली असता बशीर मुल्ला याने गुन्ह्याची कबुली दिली.

रियाज मुल्ला, लालसाब मुल्ला, राजू मुल्ला, शकील मुल्ला, रशीद मुरटगी, मैनुद्दिन रफिक मुल्ला सर्वजण रा. कडगी, ता.आलमेल, जि. विजयपूर अशी अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींची नावे आहेत.