बेळगाव / प्रतिनिधी

स्मार्टसिटी अंतर्गत शहराचा विकास साधण्यात येत आहे. या माध्यमातून शहराच्या विविध भागात रस्ते स्मार्ट बनविणे,डेकोरेटिव्ह पथदीप उभारणे यासह अनेक विकासात्मक प्रकल्प राबवले जात आहेत.

या प्रकल्पांतर्गत काँग्रेस रोडवरही स्मार्ट डेकोरेटिव्ह पथदीप उभारण्यात आले होते. या पथदीपांचे बेळगाव दक्षिणचे आ.अभय पाटील यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.