• दोन महिलांसह चार जण जखमी

अथणी /वार्ताहर 

अथणी तालुक्यातील कोकटनूर येथे तांत्रिक समस्येमुळे केएसआरटीसीच्या अथणी आगाराची बस उलटली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सावलगीहून अथणीकडे निघालेली केएसआरटीसीच्या अथणी आगाराची बस कोकटनुर येथे आली असता तांत्रिक बिघाडामुळे रस्त्याच्या कडेला येत पलटी झाली. यानंतर  स्थानिकांनी तात्काळ बसमधील प्रवाशांची सुटका केली. या घटनेत चालक वाहक आणि दोन महिलांसह चार जण जखमी झाले आहेत.  जखमींना अधिक उपचारासाठी अथणीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना ऐगली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.