• सुदैवाने दाम्पत्य बचावले


काकती / वार्ताहर

भरधाव वेगातील स्विफ्ट कारची दुभाजकाला धडक बसून कार रस्त्याच्या मध्यभागी उलटली. राष्ट्रीय महामार्गावर काकती येथे शिवाजी लोहार यांच्या गॅरेज समोर आज सकाळी हा अपघात झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कृष्णा बाबले हे  पत्नीसह कवळीकट्ट्यावरून गोव्याला जात होते. यावेळी काकती येथे आले असता एका गाडीला ओव्हरटेक करत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

दुभाजकाला धडकून भारत विरुद्ध दिशेला जात पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताची नोंद  काकती  पोलिस स्थानकात झाली आहे.