खचलेला ब्रिज त्वरित दुरुस्त करा : नागरिकांची मागणी

हुबळी / वार्ताहर

नाल्यावरील ब्रीजवरुन अवजड सामानाची वाहतूक करणारा ट्रक भरधाव वेगाने जात असताना वजनामुळे नाल्यावरील ब्रिज खचून ट्रक अडकल्याची घटना हुबळी प्रभाग क्र. 65 मध्ये येणाऱ्या तुमकूर ओणी येथे घडली. अपघाता नंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच पूर्व वाहतूक स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रक बाजूला केला.  महानगरपालिकेच्या सदस्या सुनीता बुराबुरे यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन समस्या सोडवण्यास सांगितले. खचलेला ब्रिज त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.