बेंगळूर / प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुख्यमंत्री नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकांना उपस्थित राहणार होते. मात्र कोरोनाची बाधा झाल्यामुळे  त्यांनी नियोजित सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द केले आहेत. गत जानेवारी महिन्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

 


मी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून अहवालामध्ये माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे मी घरातच उपचार घेत असून 

स्वतः विलगीकरणात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

गेल्या काही दिवसात जे माझ्या संपर्कात आले. त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी आणि विलगीकरणात रहावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.