अध्यक्षपदी रेखा सुतार तर उपाध्यक्षपदी रेखा नरोटी यांची निवड


कडोली /वार्ताहर

केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कडोली ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.ग्रामपंचायत अध्यक्षपदी देवगिरी गावातील रेखा राजू सुतार यांची तर उपाध्यक्षपदी रेखा कल्लाप्पा नरोटी यांची निवड झाली.  निवड झालेल्या काँग्रेस समर्थकांचे गावातील सदस्यांनी अभिनंदन करून मिठाईचे वाटप केले. नवनिर्वाचित ग्रा. पं. अध्यक्ष - उपाध्यक्षांनी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मलगौडा पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, राजू मायाण्णावर, राजू कुट्रे सागर पाटील, गौडप्पा पाटील, राजू सुतार,  विलास पैलवान, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.