चन्नम्मा नगर येथील घटना : उद्यमबाग पोलीस स्थानकात तक्रार दाखल
बेळगाव / प्रतिनिधी
दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना काल रात्री बेळगाव शहरातील चन्नम्मानगर परिसरात घडली.
दूध व भाजीपाला घेऊन घरी परतताना विद्याभवन शाळेच्या गेट जवळ गुरुवारी रात्री 8 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी मागे बसलेल्याने महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर ते दोघेही फरार झाले. राणी चन्नम्मा नगर सेकंड स्टेज येथील रहिवासी मीनाक्षी शंकर कबनूर असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस स्थानकात चोरट्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
0 Comments