रायबाग तालुक्यातील घटना 

मुसळधार पावसामुळे कोसळली भिंत

रायबाग / वार्ताहर

मोहरम निमित्त कुंडली पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांवर भिंत कोसळून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रायबाग तालुक्याच्या सौंदत्तीवाडी येथे ही घटना घडली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली.

ही घटना घडली तेव्हा अनेक महिला देवाची पूजा करत होत्या. त्यात मंगला हिरेगौडा आणि श्रीदेवी यांच्यासह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर महसूल अधिकारी सोमशेखर आणि ग्रामसेवक नागराज यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.