![]() |
आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होताना |
धरण 95 टक्के भरल्याने उघडले 24 दरवाजे
दिपक शिंत्रे / विजयपूर
महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या परिसरात व जिल्हात सुरू असलेल्या मूसळधार पाऊसामुळे विजयपूर जिल्ह्यातील आलमट्टी जलाशयात दिवसेंदिवस येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाढ होत असून, 75 हजार क्यूसेस पेक्षा जास्त पाणी धरणात येत असून, पाण्याचा आवक वाढण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 26 दरवाजा पैकी 24 दरवाजे उघडून एक लाख क्यूसेक पाणी बाहेर सोडण्यात येत आहे.
519-60 मीटर उंचीच्या आलमट्टी जलाशयात 519-31 मीटर पर्यंत पाणी संग्रह झाले असून 123-081टिएमसी पाणी संग्रह करण्याची क्षमता असलेल्या आलमट्टी जलाशयात 118-52 पाणी साठा आहे. 95 टक्के धरण भरले आहे.
विद्युत उत्पादन केंद्राद्वारे 45 हजार क्यूसेस तर दरवाजातून 55 क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
0 Comments