गांधीचौक पोलिसांची कारवाई
दरोड्यासाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त
विजयपूर /प्रतिनिधी
विजयपूर जिल्ह्यातील महामार्गांवर दरोडे घालणाऱ्या व मंकी कॅप नावाने ओळखल्या जाणाऱ्या चोरट्यांच्या गॅंगला गांधी चौक पोलिसांनी अटक केली.
शहर बस स्थानका नजीकच्या नायरा पेट्रोल पंपाजवळ चोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत नबीरसुला जिलानी कोरावरा, अविनाश रमेश बगाडे, अल्ताफ कुतुबुद्दीन ऐनापुर, मतिना खलील अहमद काझी, समीरा अब्दुल रजाक यरगल यांना अटक करण्यात आली आहे. तर सर्फराज फरार आहे.
अटक केलेल्या कडून दीड लाख किमतीची तवेरा कार, लोखंडी रॉड, मंकी कॅप, मिरची पावडर, दोरी, एक चाकू हे चोरीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
0 Comments