कागवाड/ वार्ताहर
अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या कागवाड तालुक्यातील उगार–मोळवाड मार्गादरम्यानचा राज्य महामार्ग रस्ता विकसित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 2 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाला आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून चालना देण्यात आली.
मोळवाड गावातील राज्य महामार्ग-72 मार्गासाठी राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत दोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यातून 5.78 किलोमीटरचा रस्ता विकसित केला जाणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एम.एस. मगदुम यांनी आ. श्रीमंत पाटील यांना दिली.
या कामाचे कंत्राटदार भाऊसाहेब जाधव, नानासाहेब जाधव यांनी आमदारांना रस्ताकाम दर्जेदार करण्याचे आश्वासन दिले. मोळवाड ग्रामपंचायत अध्यक्षा दीपा विजय खन्नीकुडे, उपाध्यक्ष शैला प्रकाश दुग्गे, चिदानंद अथणी, सुभाष अथणी, अशोक नांदणी, अमित पाटील, भास्कर हल्याळ, राजू कांबळे, संदीप मगदूम आदी उपस्थित होते.
0 Comments