खानापूर तालुक्यातील घटना 

खानापूर / वार्ताहर 

बोअरवेल सुरू करण्यासाठी स्टार्टर बॉक्समध्ये फ्यूज लावत असताना विजेचा धक्का बसून उडून पडल्याने डोक्याला मार लागून वॉटरमनचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे

38 वर्षीय ग्रामपंचायत वॉटरमन रामचंद्र राजाराम शिंदे हे नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतीजवळील बोअरवेल सुरू करण्यासाठी स्टार्टर बॉक्सजवळ गेले होते. त्यावेळी स्टार्टर बॉक्समध्ये फ्यूज टाकत असताना त्यांच्या डाव्या हाताला चुकून विजेचा धक्का बसून ते मागे उडून पडले. सिमेंटच्या खांबावर पडून डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

गावातील पाणीपुरवठा पाईप जोडण्यासाठी ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेले होते. त्यावेळी तुटलेली फ्यूज बसवताना हाताला विजेचा धक्का बसल्याने ते मागे पडले. त्यांचे डोके खांबावर आदळून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, वडील असा परिवार आहे.