वनमंत्र्यांच्या मतदार संघातून आलेय 12 जणांचे पथक

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या गोल्फ कोर्स परिसरात गेल्या वीस दिवसांपासून जनतेची झोप उडवणाऱ्या बिबट्याला शोधण्याच्या मोहिमेला वेग आला आहे.

ड्रोन कॅमेराच्या साह्याने बिबट्याचा शोध सुरू असून त्याला जेरबंद करण्यासाठी शार्प शुटर, वनविभाग,पोलीस दल, सामाजिक कार्यकर्ते, मुधोळ श्वान याचबरोबरीने शिमोग्याहून 2 प्रशिक्षित टस्कर हत्तीही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यात आता भर पडली असून वनमंत्र्यांच्या मतदार संघातून बारा जणांचे डुक्कर पकडणाऱ्यांचे पथकही या शोध मोहिमेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहे.

दरम्यान बुधवार सकाळपासून पोलीस आणि वनविभागाने या परिसरातील मार्ग बंद केले असून कोणत्याही परिस्थितीत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे.