- गळफास घेऊन संपविले जीवन
विजयपूर / प्रतिनिधी
कर्जाला कंटाळून तडलगा (ता. इंडी, जि. विजयपुर) येथील एका युवकाने आत्महत्या केली.आज दुपारी चार वाजण्याच्या ही घटना उघडकीस आली. एका शेतात सदर युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. मलकाप्पा बिरप्पा लोकुरी (वय 24) असे त्या वृद्ध युवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मलकाप्पा याने वैयक्तिक कामासाठी इंडी येथील एका बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र कर्जाचे हप्ते थकीत राहिल्याने नैराश्येतून गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच होरती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाची होरती पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
0 Comments