विजापूर शहराच्या दर्गा कारागृहातील घटना 

कारागृह पोलिसांच्या दक्षतेमुळे प्रकार उघडकीस 

विजयपूर / वार्ताहर 

तुरुंगातील कैद्यांना शक्कल लढवून  अंमली पदार्थ पुरविले जातात.  अशाचप्रकारे विजापूरच्या तुरुंगात चक्क चिकनमधून गांजा पुरविल्याची घटना  उघडकीस आली आहे.

कैद्यांना चक्क चिकनमधून गांजा पुरविण्यात येत असल्याचे कारागृह पोलिसांनी उघडकीस आणले. विजापूर शहरातील दर्गा कारागृहात बेकायदेशीररित्या चिकनच्या तुकड्यांमध्ये कैद्यांपर्यंत नेत असताना पोलिसांनी गांजा जप्त केला. या प्रकरणी प्रज्वल लक्ष्मण माबरूखाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्वल हा कैदी शाहरुखखान तेगरतीप्पी याला चिकन पीसमधून गांजा पुरवत होता. चिकनच्या मोठ्या तुकड्यामध्ये 2 ग्रॅम वजनाची एकूण 18 गांजाची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. कारागृहातील सुरक्षारक्षक बाळाप्पा देवमणी, तिम्मन्ना के, रामनगौडा या पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी आदर्शनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.