एकसंबा / वार्ताहर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले या दाम्पत्याने चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथील आपल्या निवासस्थानी ध्वजारोहण केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 13 ऑगस्टच्या सकाळपासून ते 15 ऑगस्ट च्या संध्याकाळपर्यंत घरोघरी तिरंगा ध्वज फडकावून सर्वांनी देशभक्तीपर मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जोल्ले दाम्पत्याने यावेळी केले.
0 Comments