बेळगाव :
आझादी का अमृत महोत्सवांतर्गत बेळगाव किल्ला तलाव परिसरात देशातील सर्वात उंच तिरंगा फडकला.

110 मीटर उंच असा तिरंगा ध्वज बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते बटण दाबून फडकवण्यात आला. यावेळी आमदार बेनके यांनी शहरात देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज फडकवला जाणे ही बेळगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. तसेच बेळगावकरांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.

ध्वज फडकविल्यानंतर हवेत फुगे सोडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

 या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नितेश पाटील, महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रशासन यांच्यासह नागरिक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.