विजयपूर / वार्ताहर 

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचे सोने-चांदी चोरून नेल्याची घटना विजयपूरच्या रहिमनगर येथे घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार  सिरीन दफेदार यांच्या घरात चोरीची घटना घडली आहे.

घर मालक दफेदार कामानिमित्त महाराष्ट्रात गेले होते. हीच संधी  साधून चोरट्यांनी 6 तोळे सोने व अर्धा किलो चांदी असा मौल्यवान ऐवज लंपास केला. या प्रकरणाची विजयपूरच्या गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.