खानापूर / वार्ताहर

खानापूर तालुक्याच्या करंबळ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रुमेवाडी गावातील शासकीय मराठी शाळा व अंगणवाडी केंद्राच्या छतावर एक मोठे झाड कोसळून छताचे नुकसान झाले. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेनंतर आज सकाळी पीडीओ एस. ए.मदारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल त्यांनी सरकारकडे सादर केला आहे.