विजयपूर / वार्ताहर
विजयपूर येथील ब्रह्मकुमारी केंद्राच्या वतीने आज पवित्र रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
शहराच्या मीनाक्षी चौकातील ब्रह्मकुमारी केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बी .के संगीता व सरोजिनी बी. के. यांनी पत्रकारांना राखी बांधून औक्षण केले.
यावेळी कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा कार्यदर्शी मोहन कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार राहुल आपटे, पत्रकार के. के. कुलकर्णी, कल्लाप्पा शिवशर्ण, एस.व्ही.सज्जन यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
0 Comments