•   पारंपरिक वाद्यांसह केले गणरायाचे स्वागत


थणी / वार्ताहर

नेहमीच कायदा व सुव्यवस्थेवर भर देणाऱ्या पोलीस विभागाने अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला.

होय, अथणी पोलिसांनी काल पारंपरिक वाद्यांसह गणरायाचे स्वागत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे गणरायाच्या आगमनावेळी पारंपारिक वाद्ये स्वतः वाजवून पोलीस कर्मचाऱ्यांनी    मिरवणुकीचा आनंद लुटला.

गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीची स्वतःपासून अंमलबजावणी करत पोलिसांनी डीजे, डॉल्बी आणि साऊंड सिस्टीम मला फाटा देत बाप्पांचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले.