बेळगाव : कडोलकर गल्ली येथील रहिवासी श्री. चिमणराव रुपाजी जाधव (वय ७६ वर्षे) यांचे बुधवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते म. ए. समितीचे ज्येष्ठ  कार्यकर्ते आणि तुकाराम बँकेचे माजी संचालक होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. दुपारी १२ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.