बेळगाव /प्रतिनिधी
स्वकुळ साळी (विणकर) समाज कर्नाटक राज्य पातळीय स्वकूळसाळी सांस्कृतिक महोत्सव बेंगलोर येथे दि 26 रोजी रवींद्र कलाक्षेत्र येथे संपन्न झाला.
समाजातील राज्यभरातून विविध क्षेत्रांतील पंचवीस साधकांचा गौरव या ठिकाणी करण्यात आला.नृत्य ,अभिनय, गायन ,पोवाडागायन, कीर्तनाच्या माध्यमातून मतदानजागृती, समाजसेवा व विविध क्षेत्रांमध्ये कार्य करुन नावलौकिक मिळविलेल्या साधकांपैकी आपल्या बेळगावातून कु. श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी हिची एकमेव निवड करण्यात आली आहे.
श्रेयाला शाल, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी आयोजक चंद्रबानु शिंदे, कार्यक्रमाध्यक्ष राज प्रभू धोत्रे, माजी आमदार लक्ष्मीनारायण आणि महाराष्ट्र मंत्रालयातील सेक्शन ऑफिसर विजय वक्ते, यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्रेयाने यापूर्वी विविध स्पर्धेमध्ये 150 हुन अधिक बक्षिसे मिळविली आहेत.आता या सन्मानाने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments