विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर येथील भावसार को. ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीचे अध्यक्ष राजेश देवगिरी यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

दीपप्रज्वलीत करून बोलताना राजेश देवगिरी म्हणाले, सोसायटीचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या सदस्यांची कार्यतत्परता, कार्यपद्धत पाहूनच सभासद सोसायटीवर विश्वास ठेवत असतात, सभासदांचे हित समोर ठेवून आम्ही कारभार करीत असून सभासदांचा असलेल्या विश्वास संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गामुळे सोसायटीचे सातत्यानं निव्वळ नफ्यात वाढ होत असल्याचे सांगितले.


 प्रारंभी सोसायटीचे सेक्रेटरी गणेश देवगिरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर वार्षिक अहवालाचे वाचन सौ.निर्मला सारवाड यांनी केले. याच सभेत गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम वाटप करुन गौरविण्यात आले. व्यासपीठावर ॲड. अशोक मिरजकर, ॲड. तुकाराम जवळकर, विजय नवले, श्रीकांत देवगिरी,  श्रीनिवास जवळकर, शशी चौडिहाळ, सौ. दिपा इजंतकर तर कु. पूजा रणसुभे, कु. वैष्णवी डंबळ,  नंदा कुलकर्णी, सुनील कट्टी, इरण्णा मंगळवेढे, विनोद मायी गुरूराज निडोणी व इतर उपस्थित होते.