बेळगाव/प्रतिनिधी
बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात लोखंडाची वाहतूक करणार्या ट्रकची धडक बसून शाळकरी मुलगा जागीच ठार झाल्याची घटना ताजी असतानाच राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक अपघातात सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार साजिद मुल्ला आणि त्यांचे कुटुंबीय मुलासह सातारा वडूज गावातून आज सकाळी 8.30 च्या सुमारास एस्टीम कारने कित्तूर येथे अंत्यसंस्कारासाठी जात होते. यावेळी हत्तरगीनजीक हा अपघात झाला. यात 6 वर्षांचा सिद्दीक साजिद मुल्ला यांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना अधिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
0 Comments