विजयपूर / प्रतिनिधी
विजयपुर - सोलापूर मार्गावर चालत्या कारचा टायर अचानक फुटल्याने कार उलटली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी चालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातानंतर सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच विजयपूरच्या वाहतूक विभाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कार बाजूला करून सुरळीत केली. या अपघाताची नोंद विजयपूरच्या वाहतूक विभाग पोलिस स्थानकात करण्यात आली आहे
0 Comments