बेळगाव / प्रतिनिधी  

सार्वजनिक वाचनालयातर्फे भजनी मंडळांच्या भजन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत एकूण 31 मंडळांनी सहभाग घेतला होता. गोवावेस ब्रिजजवळील मराठा मंदीर येथे या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या संगीत भजन स्पर्धेत चिन्मय भजनी मंडळ,भाग्यनगर या मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत राधा मुरगोड,जयश्री कुलकर्णी, जयश्री दिवटे, गायत्री अडके, रम्या किणी व कांचन खाडीलकर या महिला सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत भजनी मंडळाला केतकी ताम्हणकर यांनी तबला साथ तर नेहा ताम्हणकर यांनी पेटीची साथ दिली.