- अध्यक्षपदी मारुती पाटील यांची तिसऱ्यांदा निवड
- उपाध्यक्षपदी शिवाणी जोतिबा पाटील
सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसी कमिटीची नूतन कार्यकारिणीची आज शुक्रवार दि.19 ऑगस्ट रोजी जाहीर झाली. यावेळी एसडीएमसीचे विद्यमान अध्यक्ष मारुती भरमा पाटील यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड तर शिवाणी जोतिबा पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी दोनवेळा मारुती पाटील यांनी एसडीएमसी कमिटीचे अध्यक्षपद भूषविले होते.
यावेळीही अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. या शाळेची पटसंख्या 309 असून मुख्याध्यापिका सौ. नाईक यांच्यासह 9 शिक्षक शाळेत कार्यरत आहेत. शाळा सुधारण्यासाठी ग्रा. पं. निधीतून विकास कामे सुरु आहेत. माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून व गावाच्या सहकार्यातून शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गावातील इतर दानशूर व्यक्ती व अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एसडीएमसी कमिटीची नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे :
1.श्री. मारुती भरमा पाटील,अध्यक्ष
2.सौ.शिवाणी जोतिबा पाटील,उपाध्यक्षा
3.श्री.सागर भरमा सांगावकर
4.श्री.भावकू भरमा पाटील
5.श्री.भरमा परशराम कोवाडकर
6.श्री.राजू यल्लाप्पा पाटील
7.श्री.गणपत लक्ष्मण कलखांबकर
8.श्री.नारायण परशराम पाटील
9.श्री.अमृत मारुती तुप्पट
10.श्री.प्रशांत किशोर तुप्पट
11.सौ.ज्योती संजय पाटील
12.सौ.गीता संदीप पाटील
13.सौ.सोनाली मनोहर चौगुले
14.सौ.पूनम उमेश पाटील
15.सौ.रेखा जोतिबा पाटील
16.सौ.कविता यल्लाप्पा कणबरकर
17.सौ.सुजाता लक्ष्मण यादव
18.सौ.शिल्पा सुरेश नाईक
ग्रामपंचायतीच्यावतीने एसडीएमसीच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सौ.निर्मला यल्लाप्पा कलखांबकर, ग्रा. पं. अध्यक्ष, सौ.वीणा हलवाई (पी.डी.ओ.), श्री.यल्लाप्पा कलखांबकर, ग्रा.पं.सदस्य, श्री.भागाण्णा नरोटी, ग्रा. पं. सदस्य, श्री.मारुती भरमा पाटील, ग्रा. पं.सदस्य, सौ. वर्षा सागर सांगावकर, ग्रा. पं. सदस्य आदी उपस्थित होते.
0 Comments