बिबट्याच्या शोधार्थ पोलीस आणि वनखात्याची संयुक्त मोहिम
रेसकोर्स परिसरात घेतला बिबट्याचा शोध
बेळगाव / प्रतिनिधी
रेस कोर्स मैदान परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अद्यापही यश आलेले नाही. बिबट्याची हुलकावणी नागरिकांसाठी धोकादायक असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी बिबट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि वनविभागाच्या वतीने संयुक्त मोहीम राबवण्यात आली. यामुळे रेस कोर्स परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
बिबट्याचे वास्तव्य रेस कोर्स परिसरातच असून शोध मोहीम राबवण्याची गरज असल्याचे दिसून आल्याने वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. ट्रॅक कॅमेरे सीसीटीव्ही, पिंजरे लावून देखील बिबट्या अजूनही यामध्ये अडकले नसून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वनविभाग पुन्हा नव्याने सज्ज झाला आहे. यामुळे मिशन बिबट यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.
0 Comments