संकेश्वर / वार्ताहर 

गॅस गळती झाल्याने ओमनी कारने पेट घेतल्याची घटना बेळगाव जिल्ह्याच्या संकेश्वर शहरात शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


संकेश्वर बस स्थानकानजीक कार मधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालक गाडीतून बाहेर पडला. यानंतर संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कार पेटली यावेळी घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.