विजापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून दोन्ही नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील शेतजमीन आणि पिके पाण्याखाली गेली आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे विजापूर जिल्ह्याच्या पाच तालुक्यात मधून वाहणारी डोणी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीकाठावरील शेतीत पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतात पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे. विजापूर जिल्ह्यातील तिकोटा, बबलेश्वर, बागेवाडी, देवरहिप्परगी,
ताळीकोटे या तालुक्यांमध्ये वाहणाऱ्या या डोणी नदीने मोठे नुकसान झाले आहे.
0 Comments