दैव बलवत्तर म्हणून सर्वजण बचावले
विजयपूर / प्रतिनिधी
चालकाचा आगाऊपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला असता, पण सुदैवाने ते बचावल्या ची घटना विजयपूर जिल्ह्यात घडली आहे. देवरहिप्परगी तालुक्यातील सातीहाळ गावतील डोणी नदीवरील पूल अति पावसामुळे पुराच्या पाण्याखाली गेला आहे. यावेळी केएसआरटीसी परिवहन मंडळाच्या बस चालकाने पुराचा धोका लक्षात न घेता. बेजबाबदारपणे बस चालवली. यावेळी बसमध्ये 10 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. काही क्षणासाठी बस पुलावरून वाहून जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले.चालकाने मात्र कोणतीही पर्वा न करता बस पुढे नेली.
0 Comments