(जप्त करण्यात आलेल्या दुचाकींसह पोलीस अधिकारी)

चौदा लाखांच्या २६ दुचाकी जप्त : कुडची पोलिसांची कारवाई 

 बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची पोलिसांनी दोघा चोरट्याना गजाआड करून त्यांच्याजवळील चोरी चोरी केलेल्या २६ दुचाकी जप्त केल्या आहेत. कुडची, चिंचली, उगार, मंगसुळी आदी भागातील दुचाकी चोरल्या होत्या. चिंचली रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद रित्या फिरताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे काबुल केले आहे.