![]() |
(बैलहोंगल : पोलीस वसतिगृहाच्या मार्गावर कोसळलेले झाड) |
बैलहोंगल/वार्ताहर
बैलहोंगल शहरातील पोलीस वसतिगृहाकडे जाणाऱ्या मुख्य मार्ग शेजारी असलेले एक मोठे झाड सततच्या पावसामुळे मुळासकट उन्मळून पडले. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. संबंधित विभागाला या घटनेची माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत रस्त्यावर पडलेले झाड होऊन वाहतूक सुरळीत केली.
0 Comments