हुबळीत चोऱ्यांचे सत्र सुरूच 

एकाच दिवसात 6 दुकाने व एका घरावर डल्ला

हुबळी / वार्ताहर

हुबळी येथे एकाच दिवसात सहा दुकाने व एका घर फोडून पैसे व इतर वस्तू चोरट्यांनी लांबविल्या. संतोषनगर येथे रात्री उशीरा घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सराईत चोरट्यांनी संतोषनगर येथील मंजू यांच्या दुकानातून 25 हजार रुपयांच्या वस्तू, डेअरीतून 25000, किराणा दुकानपैकी 20000 इतर दुकानातून 7000 रुपयांचा ऐवज  चोरट्यांनी लांबविला.

दरम्यान चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी अशोक नगर पोलीस स्थानकात संबंधित चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.