विजयपूर जिल्ह्याच्या कोल्लार शहरानजीक अज्ञात वाहनाची दोन दुचाकींना धडक बसुन झालेल्या अपघातात दोघेही दुचाकीस्वार जागीच ठार तर अन्य एक जण जखमी झाला आहे. मेहबुबसाब जालगार (वय 21 रा. कोल्लार), सिद्धाप्पा गोळळेद्द (वय 31, रा. करजोळ) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. संपत गोळ (रा. कोल्लार) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 218 वर विजापूर-हुबळी मार्गावर सोमवारी सायंकाळी हा अपघात झाला. या घटनेनंतर अज्ञात चालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केले. या अपघाताची कोल्लार पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
0 Comments