बेळगाव / प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त तारांगण बेळगावतर्फे घेण्यात आलेल्या 'नादब्रम्ह ऑनलाईन भजन स्पर्धा, 2022' चा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत माऊली भजन मंडळ, शास्त्रीनगर बेळगावने उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर तृतीय क्रमांक पटकावला.
उषा गंगवाणी, नंदिनी दामले, विजया अंगडी, शितल आजगावकर व शोभा गंगवाणी या महिला सदस्यांनी सादर केलेल्या भजनाला मोहन भोगुळकर यांची तबला साथ तर यल्लाप्पा सावगावकर यांची संवादिनी साथ लाभली.या स्पर्धेमध्ये एकूण 21 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.
0 Comments