सुळगा (हिं.) / वार्ताहर

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी कृष्ण जन्माचा दिवस, श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणुनच या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे




हा उत्सव भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन व द्वारका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो.


श्रीकृष्ण बालवयात  आपल्या सवंगड्यांसह खोड्या करायचा, दही,दूध ताक, लोणी पळवून फस्त करायचा, खडे, दगड मारून गवळणीचे माठ फोडायचा यालाच कृष्णाच्या बाललीला असे संबोधतात. उत्सवासाठी तयार करण्यात येणाऱ्या  प्रसादाला कला असे म्हणतात. पोहे ज्वारीच्या लाह्या, धान्याच्या लाह्या, लिंब, आंब्याचे लोणचे, दही व ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर फळांच्या फोडी हे जिन्नस प्रसादासाठी वापरले जातात. हा प्रसाद श्रीकृष्णाला फार प्रिय होता.




गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या जातात. मुलांना कृष्ण व मुलींना राधेची वेशभूषा केली जाते. वैयक्तिक व घरगुती स्तरावरही मुलांना हा पेहराव करून आनंदोत्सव साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर  आजही कौटुंबिक पातळीवर चिमुकल्यांना श्रीकृष्ण व राधेची वेशभूषा करून गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली.